Hero MotoCorp ने वाढवल्या किंमती, महाग झाल्या बाइक आणि स्कूटर
आपण बाइक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करीत असाल तर आपल्यासाठी एक आवश्यक बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माण करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्प ने आपल्या उत्पादनांची किंमत 1000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. बातम्यांनुसार खर्च वाढल्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
अहवालांनुसार विविध मॉडेलनुसार ही वाढ वेगळी-वेगळी असेल. 2018-19 आर्थिक वर्षात भारतीय बाजारात हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत देखील वाढ झाली आहे आणि त्यात, त्याने आपले प्रतिस्पर्धी होंडाच्या तुलनेत सुमारे 20 लाख युनिट्स जास्त विकल्या आहे. गेल्या आर्थिक वर्षात हीरो मोटोकॉर्पची विक्री 78,20,745 युनिट्स राहिली. दुसरीकडे होंडा मोटरसायकल ऍड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ची विक्री 59,00,840 युनिट्सची होती. एक्स्ट्रीम 200 आर आणि डेस्टिनी 125 लॉन्च करण्यामुळे हीरो मोटोकॉर्पची विक्री वाढली आहे. भारतीय बाजारात डेस्टिनी 125 अतिशय पसंत करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये हीरो मोटोकॉर्पची विक्री 75,87,130 युनिट्स होती.