मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

खुशखबर, सेल्फी घेताना होणार्‍या अपघातापासून वाचवेल अॅप

सेल्फी घेण्याचा जुनून प्राणघातक ठरतं ही गोष्ट अनेकदा सिद्ध होऊन चुकली आहे. परदेशात तसेच आपल्या देशात देखील अनेक असे अपघात झाले ज्यात लोकं सेल्फी घेत होते आणि दुनियातून विदा होऊन गेले. अश्या प्रकाराच्या समस्यांपासून सुटका म्हणून एक अॅप आले आहे. अॅप लोकांना फोटो घेत असताना जवळपास असलेल्या धोक्याचे संकेत देईल.
 
इंद्रप्रस्थ इंस्टिट्यूट ऑफ इन्फॅर्मेशन टेक्नॉलॉजी-दिल्ली (आयआयटी-दिल्ली) येथील शोधकर्त्यांनी ‘सेफ्टी’ नावाचा हा अॅप विकसित केला आहे. शोधकर्त्यांनी येथील प्रोफेसर पी कुमारगुरु यांच्या नेतृत्वात अॅप तयार केले आहे.
 
हे अॅप सेल्फी संबंधित मृत्यू दर कमी करण्यासाठी एक प्रयत्न आहे असे म्हणता येईल. यात कॅमेरा बघत असलेला फोटोचा रिअल टाइम ऍनॅलिसिस करत आणि धोकादायक दृश्य बघून उपयोगकर्त्यांला सतर्क करतं. अॅप डीप लर्निंग टेक्नीक वापरू शकतं.
 
प्रोफेसर कुमारगुरु यांनी सांगितले की हे अॅप मोबाइल (इंटरनेट) डेटा बंद असल्यावरदेखील काम करतं. त्यांनी सांगितले की आपण सेल्फी घेताना रेल्वे ट्रॅक, नदीजवळ असल्यास किंवा एखादं जनावर आपल्या मागल्या बाजूला असल्यास आपण एखाद्या असुरक्षित जागेवर आहात असे नोटिेफिकेशन मिळेल.