सोमवार, 12 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (20:51 IST)

सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन गॅलक्सी J3 प्रो लॉन्च

Samsung launches Galaxy J3 Pro
सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन  गॅलक्सी J3 प्रो लॉन्च केला आहे. गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट  या रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. केवळ पेटीएमवर या फोनची विक्री सुरू आहे. फोनमध्ये 5 इंच एचडी 720×1280 पिक्सल  सुपर एमोलेड  डिस्प्ले आहे. तसेच 1.2 गीगाहर्त्झ क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅमसह हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये इंटरनल मेमरी 16 जीबी असून 128 जीबीपर्यंत मेमरी ती वाढवता येऊ शकते.  ड्यूल सिम सपोर्ट असलेला हा फोन अॅन्ड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 4जी, जीपीआरएस, 3जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि मायक्रो यूएसबी हे फीचर देण्यात आलेत. याशिवाय यामध्ये 2600 mAh बॅटरी देण्यात आली आहे.