शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (13:23 IST)

आगामी वर्षी सॅमसंगचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येणार

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मार्च 2019 मध्ये लाँच होणार आहे. यासोबतच कंपनी 5 जी नेटवर्क असलेला गॅलेक्सी एस 10 स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाई उद्योग जगातील दिग्गजांनी फेब्रुवारी 2019 मध्ये फ्लॅगशिप गॅलेक्सी एस 10 स्मार्टफोनवरून पडदा हटवला आहे.
 
यासोबतच कंपनी मार्चमध्ये फोल्डेबल गॅलेक्सी एफ फोन, गॅलेक्सी एस 10 लाँच करणार आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष आणि कंपनीने मोबाइलचे प्रमुख कोह डोंग जिनने गेल्या आठवड्यात सांगितलं की, 2019 मध्ये पहिल्या सहा महिन्यात फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. 
 
सॅमसंग आगामी फेब्रुवारी 2019 मध्ये होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये फोल्डेबल स्मार्टफोन प्रदर्शित करणार आहे. यानंतर मार्च महिन्यात लाँच करणार आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन आता 5 जी ला सपोर्ट करणार असल्याची आशा आहे.