testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शाओमी देणार वन प्लसला टक्कर, नव्या फोनचा टीझर लाँच

मुंबई| Last Modified गुरूवार, 16 मे 2019 (15:35 IST)
शाओमी मोबाइल कंपनी आता वन प्लसला टक्कर देणार आहे. शाओमी लवकरच आपला नवा फोन लाँच करणार आहे. शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनू जैन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
शाओमी भारतात आपला फ्लॅगशीप मोबाइल लाँच करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. शाओमीकडून त्यावर अधिकृतपणे काही भूमिका आली नव्हती. मात्र, मनू जैन यांच्या ट्विटमुळे शाओमी आपले दोन मोबाइल लाँच करणार असल्याच्या शक्यतेवर‍ शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये 'वन प्लस'चे अभिनंदन करतानाच शाओमीच्या नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. ट्विटमध्ये नव्या मोबाइलबद्दल फारसे काही नमूद नसले तरी या मोबाइलचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 असण्याची शक्यता आहे. हा फोन 'रेडमी के20' असणार आहे. दुसर्‍या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 700 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
'रेडमी के20' या फोनमध्ये डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर आणि सुपर वाइड अँगल कॅमेरा असणार आहे. त्याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. यामध्ये 48 मेगापिक्सलसह 8 आणि 13 मेगापिक्सलचे कॅमेरे असणार आहेत. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड 9 पाईसह 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असू शकतो. 'रेडमी के20'च्या लाँचिंगबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाही. हा फोन पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये ...

बेक्झिट : बोरिस जॉन्सन म्हणतात, UK आणि युरोपियन युनियनमध्ये अखेर करार झालाय
युनायटेंड किंग्डम आणि युरोपियन युनियन यांच्यात ब्रेक्झिटसंदर्भातला एक करार निश्चित झाला ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश ...

आचारसंहिता भंगाबद्दल राहुल गांधींवर कारवाई करा प्रदेश भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी
वणी (जि. यवतमाळ ) येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य ...

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे

दिवाळी आगोदर सहा दिवस राहणार बँका बंद, ही आहेत कारणे
ऑक्टोबर महिना संपत असून काही दिवस बाकी आहेत. उर्वरीत दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ...

विधानसभा निवडणूक: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्षाला नेमकी सुरुवात केव्हा झाली?
"नारायण राणे मातोश्रीच्या मिठाला जागले नाहीत. भाजपनं कणकवलीत इतर कुणालाही उमेदवारी दिली ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, ...

उदयनराजेंनी केलं गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याचं समर्थन, उलटसुलट चर्चा सुरू
"गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. आपण मंदिरांमध्ये ...