शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:24 IST)

किनारपटीला चक्रीवादळाचा धोका

भारतीय हवामान विभागानं (IMD)  हिंद महासागर आणि दक्षिणपूर्व बंगाल खाडीलगतच्या क्षेत्रांना धोक्याचा इशारा दिलाय. येत्या १२ तासांत चक्रीवादळ भीषण रुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केलीय. मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. पूर्व भूमध्यरेषेतील हिंद महासागर आणि त्याच्याशी निगडीत दक्षिणपूर्व बंगाल खाडीमध्ये दिसणारा दबाव उत्तर पश्चिम दिशेनं पुढे सरकतोय... ही स्थिती पुढे जाऊन भीषण रुप धारण करू शकते, असंही हवामान विभागानं म्हटलंय.  यासाठी, विभागानं तामिळनाडू, पाँडिचेरी समुद्र किनारे, कोमोरिन भाग, मन्नारची खाडी आणि केरळच्या समुद्रालगतच्या भागांना धोक्याचा इशारा दिलाय. सोमवारी, १०० किलोमीटर प्रति तासानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पश्चिम बंगाल खाडीत समुद्राच्या उंचच उंच लाटा येऊ शकतात.