शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (16:27 IST)

नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये दाखल तर विनेश फोगटने उपांत्य फेरीत धडक मारली

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर विनेश फोगटने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव केला आहे. तिने हा सामना 7-5 असा जिंकला. आता तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
 
ऑलिंपिकमध्ये फायनल गाठण्यासाठी पात्रता फेरीत 84 मीटरवर भालाफेक करावी लागते. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटरवर भाला फेकला.
 
नीरजचा प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमनंही 86.59 मीटरवर भाला फेकत फायनलचं तिकीट मिळवलं. भारताच्या किशोर जेनाला मात्र 80.73 मीटरवरच भालाफेक करता आली आणि त्याचं आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात आलं. ऑलिंपिक जॅव्हलिन थ्रो म्हणजे भालाफेकीची फायनल 8 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार रात्री 23:55 वाजता होणार आहे.
 
हॉकीमध्ये आज उपांत्य फेरीत भारताची जर्मनीसोबत लढत आहे. हा सामना जिंकला तर भारताचं किमान रौप्यपदक निश्चित होईल. अन्यथा भारताला कांस्यपदकासाठीच्या लढतीत खेळावं लागेल.