बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 जून 2021 (23:12 IST)

यशाच्या प्राप्तीसाठी 10 मूळ मंत्र

1 जे कराल ते चांगले करा-आपल्याला जे काम दिले आहे त्याला नीटनेटके आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.त्याच बरोबर कामाला उत्कृष्ट करा.आपली स्पर्धा इतर कोणाशी नाही.आपल्या मागील कारकिर्दीपेक्षा चांगले काम करण्याकडे लक्ष केंद्रित करा.
 
2 तक्रार करू नका-आपण कोणत्याही प्रश्नाला सोडविण्याचा प्रयत्न करा.समस्येला समजून त्याला स्वीकारून त्याला कसे सोडवायचे याचा कडे लक्ष केंद्रित करा, उगाच समस्येविषयी तक्रार करत बसू नका.
 
3 जास्त द्या-इतर लोकांपेक्षा अधिक चांगले आणि थोडं अधिक काम करण्याची तयारी ठेवा.जे लोक काही जास्त विचार करून काम करतात त्यांना यश मिळतं.
 
4 एखादी भूमिका घ्या-एखाद्या परिस्थितीत वाहून जाणे योग्य नाही.प्रत्येक परिस्थितीत योग्य निर्णय घ्या.त्या परिस्थितीत आपली भूमिका स्पष्ट ठेवत आपले विचार मांडा.प्रत्येक परिस्थितीला सामोरी जाऊन योग्य निर्णय घेऊन त्यात यश संपादन करा.
 
5 ध्येय ठेवा- कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी ध्येय असणे महत्त्वाचे आहे.आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे त्यासाठी ध्येय असणे महत्त्वाचे आहे.आपले लक्ष आपल्या ध्येयापासून दूर जाता कामा न ये.
 
6 मित्र देखील योग्य निवडा-आपल्या आयुष्यात मित्रांची योग्य निवड करा.बऱ्याच वेळा असे लोक असतात जे आपल्याला मित्र म्हणवून अडचणीत टाकतात. असं होऊ देऊ नका.मित्र असे निवडा जे संकटात देखील कामास येतील.यशस्वी माणसाचे मित्र देखील नेहमी यशस्वी असतात.
 
7 स्वतःवर विश्वास ठेवा-बऱ्याच वेळा कष्ट करून देखील काही लोकांना यश मिळत नाही.कारण त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो.स्वतःवर विश्वास असल्या शिवाय आपण कोणत्याही अडचणींमधून सहज निघू शकत नाही.यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास असावा.
 
8 चारित्र्याची काळजी घ्या-आपले प्रत्येक काम आपली छवी चांगली बनवतो किंवा खराब करतो.म्हणून नेहमी असे काम करा ज्यामुळे आपल्या चारित्र्यावर कोणतेही डाग लागू नये.माणसाचे चारित्र्यच त्याची सर्वात मोठी संपत्ती आहे.म्हणून आपल्या प्रतिष्ठेला लक्षात ठेऊन आपले काम करा.
 
9 जगण्याचे उद्देश्य -स्वतःला विचार की आपण कोणासाठी जगत आहोत,आपले लक्ष कायआहे?काही ही करून अपयश मिळवणे काहीही न करण्यापेक्षा चांगले आहे. आपल्या जगण्याचा हेतू शोधा आणि त्यानुसार कृती करा.यश मिळेल.
 
10 दिवसाची आनंदी सुरुवात-दिवसाची सुरुवात चांगली करा.त्यावर आपले संपूर्ण दिवस अवलंबून आहे.म्हणून सकाळी छोट्या -छोट्या गोष्टींवर न चिडता सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करा.