1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (07:45 IST)

हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस

The revised forecast
यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील 36 हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात ‘ला निनो’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला होणार आहे.
 
त्यामुळे उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी 106% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
 
हवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण आणि पूर्व विदर्भात जूनमध्ये सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल.