शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified मंगळवार, 8 जून 2021 (22:39 IST)

आत्मविश्वास वाढविण्याची गुरुकिल्ली ही आहे

प्रत्येक माणूस आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहतो. त्यासाठी 'आत्मविश्वास' असणे आवश्यक आहे. 'आत्मविश्वास' म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास असणे किंवा स्वतःवर विश्वास ठेवणे.
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर केली जाते. आत्मविश्वासासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाशिवाय कोणतेही काम यशस्वी होऊ शकत नाही.
 
आत्मविश्वास म्हणजे काय ?
आत्मविश्वास ही एक मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. हे आपल्याला कोणत्याही कार्याच्या पूर्णतेमध्ये सहजता आणि यश मिळवून देते. आत्मविश्वासाच्या शिवाय कार्यात यश मिळणे संशयास्पद असते .
 
* एकाग्रचित्त व्हा-जर एखाद्याच्या मनात कुठल्याही प्रकाराची भीती ,संशय किंवा काळजी आहे तर तो सामान्य काम देखील करू शकत नाही.संशय आणि काळजी त्याच्या मनाला एकाग्रचित्त होऊ देणार नाही.आत्मविश्वास वाढविण्यासाठी मनातून कोणतेही संशय काढून टाका आणि एकाग्रता वाढवा.
 
आत्मविश्वास एक आश्चर्यकारक शक्ती- आत्मविश्वास एक आश्चर्यकारक शक्ती आहे. ज्याच्या बळावर, एखादा व्यक्ती सर्व प्रकारच्या अडचणीचा आणि शत्रूंचा सामना करू शकतो .आतापर्यंत जगातील सर्वात मोठी कामे आत्मविश्वासाच्या बळावर केले गेले आहे आणि होत आहेत आणि होत राहतील.
 
मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवा- पालकांनी आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविला पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ नये. 'आपल्याला काहीच माहित नाही' किंवा 'आपल्यात ही कमतरता आहे' आपण हे करूच शकणार नाही ,अशे नकारात्मक वाक्य कधीही बोलू नये.या मुळे मुलांमधील आत्मविश्वास कमी होतो.त्यांच्या मनात हीन भावना निर्माण होते.ते नैराश्याकडे वाढतात.आज जगात जी नैराश्याची भावना आणि दारिद्र्य दिसत आहे त्यामागील प्रमुख कारण त्यांच्यातील हीनभावना आहे.   
 
अशाप्रकारे आत्मविश्वास वाढवा-
1 सकारात्मक विचारसरणी ठेवा -सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीला नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवणे आवश्यक आहे.सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांसह राहावे.असं म्हणतात की 'जशी संगती तशी उन्नती '
आपली विचारसरणी असेल मेंदू तसेच काम करत.म्हणून नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवा.आपल्यातल्या चुका स्वीकारा.
 
2 आत्मविश्वासाने परिपूर्ण होण्याचा सराव करा-आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करा की मी कोणतेही काम करण्यासाठी सक्षम आहे.मला कोणतेही काम करायला काहीच त्रास होणार नाही. 
 
3 भूतकाळातील चुका विसरा - भूतकाळातील चुकांना विसरून नव्याने कामाला सुरुवात करा.भविष्याची योजना आखा आणि लक्ष निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी पुरेपूर प्रयत्न करा. 
 
4 उपलब्धी लक्षात ठेवा-आत्मविश्वासाची गुरुकिल्ली म्हणजे अपयश स्वीकारणे. चांगल्या कार्यासाठी स्वत: ची स्तुती करा. आपण केलेल्या कामाची  आपण यशस्वीरित्या पुनरावृत्ती करू शकता, यामुळे आपल्यातील  आत्मविश्वास वाढेल.
 
5 नवीन शिकत राहा- जर आपल्याला सध्याची परिस्थिती कठीण वाटत असेल तर नव्या पद्धतीने कामाला शिका.काही नवीन केल्याने आपल्यातील आत्मविश्वास वाढेल आणि आपल्याला ही जाणीव होईल की मी काही वेगळं शिकलो असं केल्याने आपले काम सहज आणि कमी वेळात पूर्ण होईल.
 
6 व्यक्तिमत्त्वात सुधारणा करा- आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाकडे लक्ष देत राहा.आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकर्षक ठेवा.देहबोली म्हणजे बॉडी लॅंग्वेज आणि कम्युनिकेशन कौशल्य सुधारा.कुत्सित आणि संकुचित मनोवृत्तीचे बनू नका. नवीन माहितीसह स्वतःला अपडेट करा.आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी सुसंगत राहा.
या सर्व गोष्टीना अवलंबवून आपण आपल्या आत्मविश्वासात वाढ करू शकता.आयुष्यात यश मिळवू शकता.चला तर मग आपल्या आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी जोमाने हे अवलंबवू या.