ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)
ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रातील संत कवी ज्ञानेश्वर यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर मराठी भाषेत लिहिलेली पहिली रचना आहे. शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.
अनेक लोक याचे दररोज वाचन करतात. हे पुस्तक एका पारायणासाठी आहे जे साधारणपणे ३, ७ किंवा ३० दिवसांत पूर्ण केले जाते. अनेक वारकरी एकाच दिवसात ते पूर्णपणे वाचतात. घरी एक प्रत ठेवावी आणि दररोज कमीत कमी काही श्लोक वाचावेत असे सांगितले जाते.