1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. 11 people corona positive with dairy owner in Pune

पुण्यात प्रसिद्ध डेअरी मालकासह 11 कर्मचार्‍यांना करोनाची लागण

पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात  वाढत असतांना  हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह 11 कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. 
 
याबाबत हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे म्हणाल्या, हडपसर भागातील एका डेअरीच्या मालकाला करोनाची करोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणी नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे यानंतर संबधित व्यक्तीच्या दुकानातील इतर कर्मचार्‍यांचीही करोना तपासणी केली गेली असता  यामध्ये ते देखील  करोनाबाधित असल्याचे आढळून आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू आहेत, सर्वांची प्रकृती ठीक आहे. आता त्यांच्या डेअरीमधून ज्यांनी वस्तूचे खरेदी केली आहे. त्या ग्राहकांचा शोध घेण्यात येत असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.