पुण्यात 15 घरं जळून खाक
पुण्यात हडपसर परिसरात पत्राशेडची 15 घरं जळून खाक झाली असल्याची बातमी आहे. यात एका विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळाली आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
ही घटना वैदूवाडी झोपडपट्टीमध्ये येथे घडली आहे. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वस्तू जळाल्याने मोठं नुकसान झालं आहे.