शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (21:24 IST)

आंबेठान : शेतातील खड्ड्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू

आंबेठाण येथे सख्ख्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलांचे वडील किशोर दास कामगार असून भाड्याच्या खोलीत राहतात. घराजवळ असलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून या तिघा भावांचा मृत्यू झाला रोहित दास,(7 वर्षे), राकेश दास(5वर्षे),श्वेता दास(6 वर्षे ) अशी मयत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबियांना मोठा धक्का लागला आहे. हे शेत आंबेठाणातील नामदेव भिकाजी लांडगे यांचे असून त्याच्या जवळ भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर असून त्या घरात कामगार किशोर जोगेश्वर दास हे राहत होते. या घरा जवळच खडडा होता आणि तो पाण्याने भरलेला होता.त्यात पावसाचं पाणी साचलं होत आणि हे तिघे त्यात खेळत असताना त्यांना खड्ड्याच्या अंदाज आला नाही आणि ते तिघे पाण्यात बुडून मरण पावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.