1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मे 2025 (15:19 IST)

पुण्यात 18 वर्षीय मुलीची धारदार चाकूने हत्या,आरोपीला अटक

murder
पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात एका18 वर्षीय मुलीची रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. कोमल जाधव असे मयत मुलीचे नाव आहे. 
या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांमधील नातेसंबंध आणि पैशाच्या व्यवहारावरून हे हत्याकांड शेजाऱ्यानेच केल्याचे उघड झाले.या प्रकरणात, पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या काका-पुतण्या जोडीला ताब्यात घेतले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कोमल जाधव ही तिच्या कुटुंबासह पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात राहत होती. रविवारी कोमल जाधव घरी होती. आरोपी तिच्या शेजारी राहत होते. पैशाच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. म्हणून आरोपीने  कोमलला मारण्याचा कट रचला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, त्याने रविवारी रात्री त्याच्या पुतण्याच्या मदतीने कोमलला दुचाकीवरून घराबाहेर बोलावले आणि तिला हेल्मेट घालण्यास भाग पाडले. कोमल खाली आली आणि नंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
आरोपी आणि कोमल हे शेजारी राहायचे आणि ते रिलेशनशिप मध्ये होते. त्यांच्यात पैशाचे व्यवहार झाले. या वरून दोघांमध्ये वाद झाला आरोपीने पुतण्याच्या मदतीने तिची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit