रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (17:39 IST)

पुण्यातील जुन्नर मध्ये बस कार अपघातात 2 ठार, 15 जखमी

गेल्या काही दिवसांत अपघातात वेगाने वाढ होत आहे. पुण्यातील जुन्नर येथे एसटी बस आणि चारचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी जखमी झाले. 
 
सदर अपघात जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर ओतूरच्या जवळ झाला आहे.या अपघातात कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली  

बस पारनेरवरून मुंबईच्या दिशेने तर कार आळेफाट्याच्या दिशेने जात असताना दोघांची समोरासमोर धडक झाली. 

या धडकेत कारमधील दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.तर एसटी बस मधील 15 प्रवाशी जखमी झाले.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला.स्थानिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.  

Edited by - Priya Dixit