संबंधित माहिती
- पुण्यातील चऱ्होलीत स्कूल बसचा अपघात, सुदैवाने विद्यार्थी बचावले
- बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू
- इंदापूरजवळ कारचे टायर फुटून अपघातात 5 जण ठार
- समृद्धी महामार्गा दोन कारची धडक होऊन अपघातात 6 ठार, 4 जखमी
- हावेरी येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू
Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार
पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई वाहिनी वर नवीन बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. अक्षय व्यंकटराव ढेले असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सदर अपघात शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मुंबई वाहिनीवर खोपोली हद्दीत नवीन बोगद्यात झाला आहे. या ठिकाणी ट्रेलर कंटेनर, गॅस टँकर आणि कार वाहतूक नेणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली.
या धडकेत गॅस टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. कार वाहतूक करण्याऱ्या कंटेनरच्या चालक अपघातातनंतर पळून गेला.अपघाताची माहिती मिळाल्यावर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा,डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलची पथके घटनास्थळी दाखल झाली त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक कोडी सुरळीत केली.
Edited by - Priya Dixit
