चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 41.06 टक्के मतदान
पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत 41.06 टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. 2 मार्च रोजी या मतमोजणीचा निकाल असून, चिंचवडचा गड कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीसाठी 28 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मात्र, प्रामुख्याने या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. ज्यामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली.
510 मतदान केंदांवर हे मतदान घेण्यात आले. सकाळी 7 ते 9 या कालावधीत केवळ 3.5 टक्के मतदानाची नोंद झाली तर 9 ते 11 पर्यंत 10.45 टक्के 11 ते 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के तर दुपारी 1 ते 3 या वेळेत 30 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात 11 टक्के मतदान झाले. एकूणच मतदानप्रक्रियेत नागरिकांचा निरुत्साहच दिसून आला. 1 लाख 29 हजार 888 पुरुष मतदारांनी, तर 1 लाख 3 हजार 728 स्त्री मतदारांनी मताधिकार बजावला.
Edited By- Ratnadeep Ranshoor