गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:47 IST)

इन्वेस्टीगेशनसाठी भारतात आलोय’ असे सांगत लग्नाची मागणी घालून तरुणीची 9 लाखांनी फसवणूक

'बेटर हाफ’ या वेबसाईटवरून ओळख झाल्यानंतर तरुणीला भेटण्यासाठी बोलावून मी इंटेलिजन्स ऑफिसर आहे, मी युएस गव्हर्नमेंटचा एम्प्लॉयी आहे. माझ्या अंडर दुबई, यू एस,इंडिया असे कंट्री येतात.असे सांगून फॅशन डिझायनर तरुणीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तिची फसवणूक करत तब्बल साडेनऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका 28 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली असून चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तरुणी ही फॅशन डिझायनर आहे, बेटर हाफ या वेबसाईटवर तिची आणि आरोपीची ओळख झाली होती. त्यानंतर बाणेर परिसरातील एका हॉटेलमध्ये ते भेटले. वरील आरोपीने तिला मी इंटेलिजन्स ऑफिसर आहे असे सांगत माझ्या अंडर दुबई, यू एस.,इंडिया असे देश येतात. आम्ही एकूण 154 देश हँडल करतो. भारतात आम्ही इन्वेस्टीगेशन साठी आलो आहोत अशी बतावणी केली आणि फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले.
 
आरोपीने फिर्यादीला तुझ्यावर रॉ ची नजर आहे असे सांगत फिर्यादीचा मोबाईल, लॅपटॉप फॉर्मेट करण्यासाठी स्वतःकडे घेतला. तसेच फिर्यादीला गुजरातमधील एका टेक्सटाईल मिल मधून कमी किमतीत कापड मिळवून देतो असे आमिष दाखवले आणि वेळोवेळी तिच्या बँक खात्यातील 8 लाख 37 हजार रुपये स्वतःच्या आणि इतर बँक खात्यात ट्रान्सफर केले. तसेच फिर्यादीचा एक लाख 28 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप तिला परत न देता फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.