गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (15:45 IST)

पुण्यात मांजरी येथे बॉम्बसदृश वस्तू आढळली

पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द स्मशान भूमी जवळ आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या बाजूस ही वस्तू सापडली आहे. अभिमान रोहिदास गायकवाड यांच्या ही वस्तू निदर्शनास आली. त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याविषयी माहिती दिली. या दोघांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क करुन माहिती दिली. बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पुणे शहर पोलीस दलाचे बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले आहे. याठिकाणी खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आला आहे. 
 त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे ते आता वर आलेले दिसत आहे. पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.