मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (12:58 IST)

पुण्यात पॉर्न व्हिडीओ दाखवत पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

A five-year-old boy was sexually assaulted
पुण्यात सध्या अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 
पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाला तीन अल्पवयीन मुलांनी पॉर्न व्हिडीओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे. 
 
सदर घटना पुण्याच्या कोंढवा परिसरात शुक्रवारी घडली आहे. पीडित मुलगा मोठ्या भावासह सोसायटीच्या आवारात खेळत असताना तीन अल्पवयीन मुलांनी त्याला नेऊन मोबाईल वर पॉर्न व्हिडीओ दाखवले नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

पीडित मुलाच्या मोठ्या भावासमोरच हे कृत्य झाल्याचे उघडकीस आले आहे. घरी आल्यावर पीडित मुलाने घडलेले सर्व सांगितले. मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
Edited by - Priya Dixit