1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (08:24 IST)

‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीची हत्या करून आरोपी पोलिसांसमोर हजर

Accused of killing
लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षीय तरुणी सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिचा खून केला आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पेरणे फाटा परिसरात हा प्रकार उघडकीस आला.
 
सागर सारधर वानखेडे (वय 28, पेरणे फाटा, मूळ, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. तर मृत तरुणीचे वय 16 वर्ष सहा महिने इतके आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केला असल्याची माहिती पुढे येत आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर वानखेडे हा पेरणे फाटा परिसरात एका अल्पवयीन तरुणीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. आरोपी बुलढाण्याचा रहिवाशी आहे. तो येथीलच एका तूप बनवणाऱ्या कंपनी काम करत होता. तर मृत तरुणी मुंबईची रहिवासी आहे. हे दोघे एकत्र कसे आले याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र मागील काही दिवसापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे.