अण्णा हजारेंची प्रकृती ठणठणीत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या हृदयात छोटे ब्लॉकेज आढळल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अण्णांची तब्येत ठणठणीत असून काळजीचं कोणतंही कारण नाही, असं अण्णांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अण्णा हजारे गुरुवारी दिवसभर कार्यकर्त्यांच्या शिबिरात होते. त्यांचं दैनंदिन कामकाज सुरू आहे. गेला दीड वर्ष कोरोना स्थितीमुळे अण्णांचं रूटीन चेकअप करण्यात आलेलं नव्हतं.
गुरुवारी (25 नोव्हेंबर) डॉक्टरांनी प्राथमिक तपासण्या केल्यानंतर पुढील तपासण्या पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये करण्याची सूचना केली. त्यानुसार अण्णांना पुण्यातील रुबी हॉल इथं आणण्यात आलं आहे.