गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (16:19 IST)

अपघात करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची गाडी समजून दुसरीच गाडी जाळली

Another car
पुण्यात अपघात करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची गाडी समजून दुसऱ्याच डिलिव्हरी बॉयची गाडी एका व्यक्तीने जाळली. ही घटना  हिंजवडी फेज 1 येथील देशी ढाबा हॉटेल जवळ घडली.
 
माधव पंडित गायकवाड (वय 26, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनोळखी व्यक्ती आणि एका डिलिव्हरी बॉयचा अपघात झाला. त्या कारणावरून आरोपी एका दुचाकीवरून आला. त्याने अपघात करणाऱ्या डिलिव्हरी बाॅयची गाडी समजून फिर्यादी यांची गाडी (एम एच 24 / बी सी 4838) ज्वलनशील पदार्थ टाकून जाळली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.