शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (16:25 IST)

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

योग आणि आयुर्वेदासाठी प्रसिद्ध असणारे बालाजी तांबे यांचं आज पुण्याच्या रुग्णालयात निधन झालं ते 81 वर्षाचे होते.
 
त्यांची प्रकृती गेल्या आठवड्यापासून बरी नव्हती आणि त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते त्यांच्यावर योग्य उपचार सुरु होते. परंतु त्यांच्या शरीराने उपचाराला कोणतेही प्रतिसाद दिले नाही.अखेर आज मंगळवारी त्यांची प्राण ज्योत मालवली.संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

त्यांचे गर्भसंस्कार हे पुस्तक खूपच चर्चित झाले.त्यांच्या या पुस्तकाचा इंग्रजीसह सहा इतर भाषांमध्ये अनुवाद झाला होता.ते विविध वृत्तपत्रातून, मासिकातून,टीव्हीच्या माध्यमातून विषयाचे प्रबोधन करायचे.त्यांनी सर्वसामान्य माणसात आयुर्वेदाबाबत जनजागृती निर्माण केली.

आयुर्वेद,अध्यात्म आणि संगीत यांची सांगड घालून आयुष्याला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्यपूर्ण बनवता येत.हा संदेश त्यांनी गेल्या 5 दशकांपासून देत होते. त्यांनी आयुर्वेदाचा भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील प्रसार आणि प्रचार केला.त्यांनी आयुर्वेदाची माहिती जगातील अनेक देशात पोहोचविली.