मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 डिसेंबर 2025 (14:10 IST)

भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद

Bhimashankar Temple to remain closed for 3 months
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी  जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर पुढील तीन महिन्यांसाठी बंद राहण्याची अधिकृत घोषणा मंदिर प्रशासनाने केली आहे. 
भीमाशंकर मंदिरात देशभरातून दर्शनासाठी येतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं भीमाशंकर 1 जानेवारी पासून बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात नियोजित विकासकामे आणि संरचनात्मक सुधारणा करण्यात येण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
नवीन विकास आराखड्यानुसार, मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण आणि परिसरातील आवश्यक कामे करण्यात येणार असून भाविकांची सुरक्षेला लक्षात घेता. मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना त्रास होऊ नये या साठी  1 जानेवारी 2026 पासून  पुढे तीन महिने मंदिर बंद राहणार आहे. भाविकांनी त्यापूर्वी दर्शनास यावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit