शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (07:48 IST)

राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. राज्यपालांची हकालपट्टी आणि भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
 
पुण्यातील एसएसपीएम महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राज्यातील विरोधी पक्ष आणि पुरोगामी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रेमींनी संवैधानिक पद्धतीने आणि स्वयंप्रेरणेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीनंतर करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor