1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

'या' कुटुंबाला सोसायटीच येऊ देऊ नका

corona effect
पुण्यातले काही लोक कोरोनासंदर्भात आततायीपणा करत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर ही उच्च्भ्रू वसाहती आहे. याच सोसायटीतल्या नागरिकांनी कोरोनासंदर्भात विचित्रपणा केलाय. या सोसायटीमधलं एक कुटुंब मलेशियाला पर्यटनासाठी गेलं आहे. रविवारी हे कुटुंब परतणार आहेत. पण त्यांना कोरोना ची लागण झाली असेल, या भीतीने सोसायटीतल्या लोकांनी चक्क पोलीस स्टेशन गाठलं आणि या कुटुंबाला सोसायटीच येऊ देऊ नका, अशी मागणी केली.
 
या घटनेचा पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशननेही निषेध केलाय. पण पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांनीही परत येताना पूर्ण तपासणी करूनच सोसायटीमध्ये प्रवेश करावा असं आवाहन केलं आहे.