1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated: शनिवार, 21 मे 2022 (12:11 IST)

लाल महालात लावणी करणे महागात पडले, वैशाली पाटील सह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या लालमहालच्या परिसरात 16 एप्रिल 2022 रोजी लावणी करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिला चांगलेच महागात पडले आहेत. या प्रकरणी लालमहालाचे रखवालदार राकेश विनोद सोनावणे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. लाल महालाचे पावित्र्य वास्तूचे पावित्र्य भंग केले. त्यानुसार वैष्णवी पाटील आणि दोन पुरुषांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लालमहालात नृत्य केल्या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन व्यक्तींवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी वैष्णवी पाटील हिने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लावणीवर नृत्य केल्याचा व्हिडीओ शूट करून त्याला सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाते जिजाऊ यांचे वास्तव्य  असलेल्या या वाडयात अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिवप्रेमी संतापले होते. आहे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्या नंतर फरासखाना पोलिस ठाण्यात या प्रकरणी मराठी कलाकार वैशाली पाटील आणि तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.