शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 23 जुलै 2023 (13:45 IST)

दौंड : एसटी बसमध्ये प्रवाशांन कंडक्टरवर चाकूने हल्ला केला

दौंड साताऱ्या हुन बारामती मार्गे पैठण एसटी बसच्या वाहकाला प्रवाशांन चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्ल्यात कंडक्टर  जखमी झाला आहे. दत्ता संतराम कुठे असे या वाहन वाहकाचे नाव आहे.
 
सातारा -पैठणएसटी बस मध्ये हा प्रकार घडला असून कुटे यांच्या तक्रारी वरून आरोपी हरून इकबाल कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     
 
आरोपी कुरेशी ने एसटी वाहक दत्ताराम कुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या हल्ल्यात कुटे यांच्या ओठावर जखमा झाल्या आहे. कुटे यांच्या तक्रारीवरून आरोपी हरून इकबाल कुरेशी याच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे
 
आरोपीने दत्ताराम यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. काही प्रवाशांनी मध्यस्थी 
केल्यावर आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ केली. या प्रकारा नंतर प्रवाशांची आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


Edited by - Priya Dixit