रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (14:39 IST)

पुण्यात भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी सकाळी ३.३ तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने याबाबत माहिती दिली आहे. मागील महिन्यातही पुण्याच्या पुरंदरमध्ये भूकंपाचे हादरे बसले होते.

पुरंदरमध्ये आलेल्या भूकंपामुळे पुण्यात जवळपास २ तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु पुण्यात आलेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित आणि आर्थिकहानी झाली नाही आहे.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र असलेल्या पुण्यात सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी ५.२९ वाजता जमिनीत ६ किलोमीटरंतर्गत हा भूकंपाचा झटका जाणवला होता.
 
पुण्यातील पुरंदरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भुकंपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. परंतु भूकंपाच्या धक्क्याने पत्रे, मोकळी भांडी, वस्तुला कंपने जाणवत होती.