शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (08:15 IST)

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येने गेल्या दोन महिन्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एका दिवसात मुंबईत कोरोनाबाधितांचे प्रमाण सातशेवर गेले आहे. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या २४ तासांत ७२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील  कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख १५ हजार ७५१वर पोहोचली असून आतापर्यंत यापैकी ११ हजार ४२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. 
 
मात्र आढळलेल्या ७२१ रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाही आहेत. त्यामुळे रुग्णालयावर जास्त ताण नाही आहे. बरेच रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. सध्या मुंबईत वाढलेल्या ९८ टक्के कोरोनाबाधित केसेस या हायरारकी इमारतीच्या परिसरातील आहेत. दाटीवाटीच्या भागातून, झोपडपट्टीच्या भागातून जास्त केसेस येत नाही आहेत. सध्या मुंबईत चाचण्याचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे.