शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 10 जुलै 2020 (07:28 IST)

अभियंत्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे- नाशिक महामार्गावरील मोशी येथे एका 24 वर्षीय अभियंत्याने एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
 
अक्षय पोतदार (वय 24, रा. चिखली, साने चौक. मूळ गाववाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सोसाटीतील इमारतीवरून उडी घेत अक्षने आत्महत्या केली, तिथे तो राहण्यास नव्हता. दरम्यान, आई, बाबा आणि बहिणीला सांभाळ मी दुसर्या जगात जात आहे, अशा आशयाचे व्हॉट्‌सअॅप स्टेटस्‌ त्याने आत्महत्येपूर्वी ठेवले असल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.