शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 19 डिसेंबर 2021 (16:32 IST)

उद्योजक जगन्नाथ शेट्टी यांचं वृद्धापकाळाने निधन

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचे सर्वेसर्वा उद्योजकजगन्नाथ शेट्टी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असता त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी जावई, नातवंड असा परिवार आहे. 
जगन्नाथ शेट्टी यांना त्रिदल संस्थेने प्रतिष्ठित 'पुण्यभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. जगन्नाथ शेट्टी हे मूळचे कर्नाटकचे असून वयाच्या 17 व्या वर्षी पुण्यात येऊन 'केफे मद्रास ; रेटारेन्ट सुरु केले. त्यानंतर मद्रास हेल्थ होम आणि वैशाली हॉटेल सुरु केले. सुरुवातीच्या काळात वैशाली हॉटेल हे छोट्या स्वरूपात होते नंतर हॉटेल वैशाली हे पुणेकरांच्या मनामनात पोहोचले . या हॉटेल ला पुणे महापालिकेकडून 'क्लिनेस्ट किचन 'हे पुरस्कार देखील मिळाले आहे.