शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (14:54 IST)

पुण्यातील हॉटेलला आग

पुणे शहरातील लुल्लानगर भागातील विजेता हॉटेलला मंगळवारी सकाळी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान, तेथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथून गॅस सिलिंडर बाहेर काढला आहे. या हॉटेल इमारतीत कार्यालये आणि सोन्याची दुकाने आहेत.
Edited by : Smita Joshi