शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2022 (12:54 IST)

आंबा विक्रीत फसवणूक?

पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात केरळच्या आंब्याचा चक्क देवगडच्या हापूस आंब्यात बदल करुन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात बाजार समिती प्रशासनाने  फौजदारी गुन्हे दाखल केला आहे.
 
केरळचा आंबा हा देवगडचा आंबा असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आंबा विक्रीत गैरप्रकार आढळल्यास माल जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.
 
त्यानुसार समिती प्रशासनाने आडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एका डझनाच्या ४२ पेट्या जप्त केल्या आहेत. त्या पेट्यांची बाजार समितीने विक्रेत्यांमार्फत विक्री करून, तसेच दंडात्मक कारवाई करून बाजार समितीकडे २३ हजार ७०० रुपये जमा केले आहेत.
 
आंबा विक्रीत ग्राहकांची फसवणूक करू नये. असा गैरप्रकार झाल्यास अरवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा बाजार समिती प्रशासनाने दिलाय.