1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (07:30 IST)

घासून नाय तर ठासून आलोय ! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘भाऊ’ बायडेन अन् ‘आक्का’ हॅरीस यांच्या अभिनंदनाच्या कमानी

Ghasun Nai but Thasun Aalo!
अमेरिकेच्या सत्ताकारणात बायडन पर्व सुरु झाले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस शपथ घेणार आहेत. तर जो बायडन हे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती बनल्या. कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या असून त्यांची 49 व्या उपराष्ट्रपदी पदी नियुक्ती झाली. त्यामुळे कमला हॅरीस यांचे अभिनंदन करण्यासाठी पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाजवळी पादचारी पुलावर त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. या फ्लेक्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल होत आहे. सध्या शहरामध्ये हे फ्लेक्स चर्चेचा विषय बनले आहेत.