गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)

गिफ्ट पडले महागात, आयफोन गिफ्टचे अमिष दाखवून तब्बल 9 लाखांचा गंडा

पुण्यात आयफोन गिफ्टच्या अमिषाने सायबर चोरट्याने महिलेला तब्बल 9 लाख 30 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी मेधा समीर म्हात्रे (वय 47) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेधा कुटुंबीयांसह विमाननगरमध्ये राहायला आहेत. त्यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. 1 जुलैला मेधा ऑनलाईन नेट सर्फिंग करताना सायबर चोरट्याने त्यांना ऑफर देण्याच्या नावाखाली 1 हजार 499 रुपयांचे शूज खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना फोन करून आयफोन जिंकल्याचे सांगितले. त्यासाठी जीएसटी, इन्शुरन्सची विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले.
 
आयफोन मिळण्याच्या अपेक्षेने मेधा यांनी सायबर चोरट्याच्या विविध बँकखात्यात ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 9 लाख 30 हजार रुपये जमा केले. मात्र, वेळोवेळी रक्कम जमा करूननही आयफोन मोबाईल मिळत नसल्याचे मेधा यांच्या लक्षात आले.