1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (14:30 IST)

पतीने पत्नीला जिवंत जाळले, आरोपीला पतीला अटक

पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगर या ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीने स्वयंपाकाला उशीर केल्यामुळे संतापून एका तरुणाने आपल्या पत्नीवर डिझेल ओतून तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राहुल विठ्ठल पारधे असे या आरोपी पतीचे नाव आहे. तर 28 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

आरोपी पतीने पत्नीने स्वयंपाक करायला उशीर केल्याच्या कारणांवरून पतीला राग आला आणि त्याने आपल्या पत्नीवर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नेहरूनगर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.