शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (13:07 IST)

किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. या हल्ल्यामध्ये ते पायऱ्यांवरून घसरून पडले होते आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यांना सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवत गाडीत बसवले होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते. आज त्यांना पुण्यातील संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. किरीट सोमय्या काल पुण्याच्या महापालिकेत कोविड सेंटर्समध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी महापालिकेत आयुक्त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर शिवसैनिकांनी आक्रमक होत धक्काबुक्की केली त्यात ते पायऱ्यांवरून घसरून पडले होते. आज त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.