सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (13:36 IST)

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी पुण्यात आले असता शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला असता ते जखमी झाले. या प्रकरणी दखल घेत पुणे पोलिसांनी सात ते आठ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटर मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या पुण्यात शनिवारी आले होते. दरम्यान शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांचासह आलेले काही साथीदार किरीट सोमय्या यांना निवेदन  देण्यासाठी गेले असता काही शिवसैनिकांनी त्यांना अडवून घोषणाबाजी सुरु केली. हनक उडालेल्या गोंधळामुळे झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या हे पायऱ्यांवरून घसरून पडले आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या प्रकरणानंतर शनिवारी भाजप पुणेचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शिवसैनिकांच्या विरोधात जाऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप केला आहे. 

शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी 7 ते 8 शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.