शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (15:33 IST)

उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले

Leopard cubs in a sugarcane field in pimpari chinchwad
पिंपरी चिंचवड येथील हिंजवडीच्या आयटीनगरी जवळील नेरे गावठाण परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. सोमवारी सीताई बंधार्‍या जवळील मोहन जाधव आणि राहुल जाधव यांना तीन मादी पिल्ले आढळून आली. जाधव यांनी तात्माळ वन विभागाच्या अधिकार्‍यांना याची माहिती दिली.
 
अधिकार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत मादी पिल्ले ताब्यात घेतली. ही पिल्ले पंधरा ते तीस दिवसापर्यंतची असल्याचे अंदाज आहे. पिल्ले लहान असल्यामुळे मादी शिवाय राहू शकत नाही म्हणून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
 
दरम्यान रात्री अपरात्री शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे तसेच खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.