शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:18 IST)

भरधाव ट्रकची कार आणि दुचाकी गाड्यांना जोरदार धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडलेल्या अपघातात चार जणांना जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
शिक्रापूर येथील 24 वा मैल येथे रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने कार आणि दुचाकी गाड्यांना जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला.  ट्रक पुण्याकडून नगरच्या दिशेला जात होता तर चारचाकी कार आणि दुचाकी नगर कडून पुण्याच्या दिशेने जात होत्या. भरधाव ट्रक डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने जाऊन एका कार आणि दोन टू व्हिलर ला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चुराडा झाला.
 
अपघातात दुचाकीवरील विठ्ठल हिंगाडे व रेश्मा हिंगाडे या पती पत्नी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर कारमधील लिना निकसे यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृतामधील एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. जखमींची ही ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहे.