शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 20 जानेवारी 2022 (15:47 IST)

थंडीने गारठून गेलं दीड महिन्याचं बाळ, चहाच्या टपरीच्या आडोशाला ठेवलं होतं

पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव पाटी येथे एका धक्कादायक प्रकारात रसत्याच्या कडेला बाळ सापडलं आहे. थंडीच्या कडाक्यात मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी आपल्या नवजात बालकाला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. 
 
निर्दयीने एक ते दीड महिन्याच्या बाळ कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीच्या आडोशाला ठेवले. नंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास येथील कामगाराच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याने लगेच शेजारीच असलेल्या पेट्रोलपंपाचे मालकाला सांगितली. मालकाने घटनास्थळी धाव घेत इंदापूर पोलिसांना याबाबद माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून बाळ ताब्यात घेतलं आहे.
 
बाळ चहाच्या टपरीच्या आडोशाला ठेवले होते. माहितीनुसार  मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी महिला बाळाला तिथेच सोडून निघून गेली. थंडीचा कडाक्यात उघड्यावर असलेला चिमुकला जीव गारठले होते. एका कामगाराच्या लक्षात आल्यावर पुढील कार्रवाई करण्यात आली तोपर्यंत कामगाराच्या पत्नीने मुलाला आपल्या जवळ घेऊन बाळाला शेकोटीची ऊब दिली. 
 
इंदापूर पोलिसांनी बालकाला पुढील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या बालकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.