बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (10:52 IST)

भीषण अपघातात सराफा व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू

पुणे जिल्ह्यात बारामती मोरगाव रस्त्यावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याने जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरचा ट्रॉलीला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने बारामतीतील सराफा व्यावसायिकाच्या कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झाला. 
 
बारामतीतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक श्रेणिक भंडारी, यांच्या पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी, आणि बहीण कविता  यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीररित्या जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पुण्यात एका कार्यक्रमाला आले होते. परतीच्या प्रवासात बारामती मोरगाव रस्त्यावरील तरडोली जवळ त्यांची चारचाकी उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक लोकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.