बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (14:41 IST)

पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं पुण्यात निधन

पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेतच हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे . त्यांच्या वर पुण्यातील वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे बालपण निसर्गरम्य ग्रामीण भागात गेलं. निसर्गरम्य वातावरणाचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम पडला.
मराठी प्रकाशन  विश्वातील ही मोठी धक्कादायक घटना असल्यानं प्रकाशन विश्वासह साहित्य विश्वाला धक्का बसला आहे. ते मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष होते. बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास या विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांना विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पद्मगंधा आणि आरोग्य दर्पण हे दिवाळी अंक प्रकाशित होतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे. भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर, शोधवेडाच्या कथा आदी विपुल साहित्य प्रकाशित केलं आहे. अरुण जाखडे यांच्या निधनाने प्रकाशन व्यवसाय जगताला मोठी हानी झाली आहे.