1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (17:50 IST)

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

MPSC student commits suicide in Pune पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या Marathi Pune News In Webdunia Marathi
पुण्यातील सदाशिव पेठेत राज्य लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमर मोहिते असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. MPSC च्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना पुण्यात घडली आहे. या पूर्वी सचिन लोणकर नावाच्या विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपविले होते. अमर हा मूळ सांगलीचा राहणारा होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे त्याला पीएसआयच्या फिजिकल मधून  बाहेर पडावे लागले या मुळे तो नैराश्यात गेला होता. अमर सांगलीतून पुण्यात राज्य आयोग च्या पीएसआय फिजिकल परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता आणि तो सध्या सदाशिव पेठेतील एका हॉस्टेल मध्ये राहत होता.पण मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे त्याला पीएसच्या फिजिकलमधून बाहेर पडावे लागले आणि तेव्हा पासून तो तणावात राहत होता. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याला संपविले.आज सकाळी त्याने राहत्या खोलीत विषप्राशन करून आत्महत्या केली.  कोरोनामुळे राज्य सेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली या मुळे त्याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना पडला आहे. या पूर्वी MPSC चा विद्यार्थी असणाऱ्या पुण्यातील सचिन लोणकर याने देखील नैराश्यातूनआत्महत्या केली आहे. पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी धक्कादायक घटना आहे.