मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (11:10 IST)

शिवणेत 15 वाहने आगीत जळून खाक

पुण्याजवीळ शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील 13 दुचाकी आणि 2 रिक्षा आगीत जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी पहाटे 5 वाजता घडली. जाणीवपूर्वक आग लावून वाहने जाळल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
 
ही इमारत 5 मजली आाहे. वाहनांना आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. सर्व वाहने पेटून गेली होती तरी जवानांनी तातडीने आग विझविली.