शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (23:23 IST)

मद्यधुंद कार चालकाने लोकांना पायदळी तुडवले, व्हिडीओ व्हायरल

Drunk car driver trampled people
मद्यधुंद कार चालकाने लोकांना पायदळी तुडवल्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या कार चालकाने आपली कार रस्त्यावर पुढे न नेता मागच्या गिअरमध्ये टाकली आणि या कारची धडक लागून एक महिला किरकोळ जखमी झाली असून एक भाजीविक्रेता गंभीररीत्या जखमी झाला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,  ही घटना बुधवारी रात्री पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, मद्यधुंद अवस्थेत या चालकाने कार पुढे नेण्याऐवजी मागे वळवली.
सुदैवाने त्यावेळी जास्त वर्दळ नव्हती . या घटनेनंतर कारचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र या अपघातात कारचेदेखील मोठे नुकसान झाले आहेत.