रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (08:51 IST)

आधी फेसबुकवरून प्रेमात ओढले, शारीरिक संबंधाची केली मागणी, बदनामीची धमकी दिली पुढे ........

पुणे जिल्ह्यातील आळंदीत विवाहित महिलेने वीस वर्षीय तरुणाला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर  माझ्या सोबत शारीरिक संबंधत ठेव असे म्हणून पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणाला कंटाळून आणि बदनामी होण्याच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली असून याप्रकरणी विवाहित महिले विरोधात तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या घटनेत, आत्महत्या करणारा तरुण हा एसवायबीकॉम या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने त्याला फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट झाले. हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून वीस वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैश्यांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळला होता. तो मानसिक तणावात गेला. अखेर तरुणाने आत्महत्या केली. 
 
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.